ससा आणि कासव Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा हा नावाप्रमाणे चतुर आणि चपळ आणि कासव थोडे Marathi Story मंद असते. परंतु दोघांची चांगली मैत्री असते.
एकदा सशाच्या मनामध्ये कासवा सोबत पैज लावण्याची इच्छा होते व तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया जो कोणी या पैजमध्ये जिंकले तो सर्वश्रेष्ठ असेल. ठरल्याप्रमाणे कासव देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते की जो कोणी समोरच्या टेकडी पर्यंत सर्वात प्रथम पोहोचले तो ही शर्यत जिंकले.
ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीला खूप धावत पळत सुटला आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत ह्होते. थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पहिले तर त्याला कासव कोठे ही दिसले नाहीत त्यावर कसा म्हणाला, "जोपर्यंत कासव माझ्यापर्यंत पोचतील तोपर्यंत एक झोप घेतो." असे म्हणून ससा एका झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला.
कासव हळूहळू चालत ससापर्यंत Marathi Story आले व कासवाने पहिले ते ससा विश्रांतीसाठी झोपला आहे. कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालत होते. कासव टेकडी ओअर्य्न्त पोचणार तोच सशाला जाग आली. ससा उठून पाहतो तर काय कासव त्याला कोठेही दिसेना त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससाच्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.
तात्पर्य :- या बोधकथा यावरून आपल्या लक्षात येते की कधीही कोणाला कमी समजू नये व प्रयत्न केल्यानंतर यश आपोआप मिळते.

Comments
Post a Comment