उंदराची टोपी Marathi Story
![]() |
| Marathi Story |
उंदराची टोपी
एक होता उंदीरमामा. रस्त्याने Marathi Story जाताना त्याला मिळाले एक फडके. फडके घेऊन तो गेला धोब्याकडे.धोब्याला म्हणाला धोबीदादा, धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदीरमामा गेला शिंप्याकडे. शिंपीदादा, शिंपीदादा, शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदीरमामाला टोपी शिवून दिली.
उंदीरमामाने टोपी डोक्यावर घातली Marathi Story एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला. राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढूम,ढूम,ढूम ! राजाने हे एकले. तो शिपायांना म्हणाला जा रे, त्या उंदराला पकडून आणा.
शिपायांनी उंदीरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदीरमामा म्हणाला राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढूम,ढूम,ढूम ! हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदीरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढूम,ढूम,ढूम ! हे गाणे गात गात तो राजवाड्यातून निघून गेला.
उपदेश : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

Comments
Post a Comment