बुड बुड घागरी Marathi Story

 

Marathi Story

      बुड घागरी तो टोपी Marathi Story घालणारा उंदीरमामा आठवतोय ? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे मित्रांनी खीर करण्याचे ठरवले. माकड म्हणाले 'मी आणतो साखर',मांजर म्हणाले 'मी आणतो दूध. तिघांनी पातेलेभर खीर केली.मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी. 

     ते अर्ध्या वाटेतूनच Marathi Story परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोड्या वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले,'मला नाही माहित.' मग माकडाने एक घागर घेतली  व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले.'हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. 

   मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला 'चुं चुं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले 'म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी,मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. अन काय आश्यर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.    

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story