चल रे भोपळ्या टुणूक टुणूक Marathi Story

 Marathi Story

        एक होती म्हातारी. एकदा  Marathi Story ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो.' पण म्हातारी हुषार होती. 

        ती म्हणाली मला खाऊन  Marathi Story तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते, तूपरोटी खाते, लठ्ठ मठ्ठ होते, मग मला खा. कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला, 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.  त्यापेक्षा थोडे दिवस थांब,लेकीकडे जाते, तूपरोटी खाते, लठ्ठमठ्ठ होते, मग मला ख.' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली. लेकीकडे गेली. 

       ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमठ्ठ झाली. थोड्या दिवसांनी तिला वाटले की आपण आपल्या घरी जावे तेव्हा तिला आठवले की कोल्हा आणि वाघ आपल्याला खाणार आहे. तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले. मग लेकीने तिला जादूचा भोपळा दिला. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठं लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळ्याला म्हणाली 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पहिला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब !' आतून म्हातारी म्हणाली कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. 

       थोडं पुढे गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब !' आतून म्हातारी म्हणाली कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी.कोल्ह्याने भोपळ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. 

       पण म्हातारी आतून म्हणाली चल रे भोपळ्या टुणूक टुणूक !'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला. अशी होती म्हातारी हुषार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळ्यात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली. 

तात्पर्य - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ. 

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story