दोन बेडूक Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एकदा दोन बेडूक दुधाच्या भल्या मोठ्या भांड्यात पडले. भांड्यातून बाहेर पडण्यासाठी ते दुधात गोल गोल पोहू लागले. उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्यांच्या पायांना कशाचाही आधार मिळत नव्हता. त्यामुळे त्यांना उडी मारून बाहेर पडता Marathi Story येईना.
थोड्या वेळानंतर एक बेडूक म्हणाला, 'आता मी खूप थकलोय. मी आता आणखी पोहू शकत नाही. मी माझे प्रयत्न सोडून देतो." त्या बेडकाने पोहणे थांबवले. हळूहळू तो भांड्याच्या तळाशी गेला. दुधात बुडून मरण पावला. दुसरा बेडूक म्हणाला, " ,मी प्रयत्न सोनार नाही. मी पोहतच राहीन. काहीतरी घडेल आणि माझी नक्की सुटका होईल." असे म्हणून तो बेडूक पोहतच राहिला.
त्याच्या हालचालींमुळे दुध घुसळले Marathi Story गेले आणि त्यावर मलई आली. बेडूक त्या मलईच्या गोळ्यावर चढला आणि त्याने भांड्याच्या बाहेर उडी मारली.
तात्पर्य :- जो चिकाटीने प्रयत्न करतो, त्याला यश मिळतेच.

Comments
Post a Comment