स्वार्थी मित्र Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एका गावात दोन मित्र राहत होते त्यांचे नाव राम आणि शाम. एके दिवशी ते फिरण्यासाठी शेजारच्या जंगलात दुपारी बाहेर पडले. जंगलात जाताना त्यांनी एकमेकांना वचन दिले की संकटात एकमेकांचे रक्षण करायचे.
ते जंगलामध्ये मध्यभागी पोहचताच अचानक एक अस्वल धावत त्यांच्याकडे येत असताना दिस्के. राम स्वताचा जीव वाचवण्यासाठी पटकन शेजारच्या झाडावर चढतो पण शामला झाडावर चढता येत नाही. शाम घाबरून जातो त्याला काही सुचत नाही Marathi Story आणि जमिनीवर झोपतो आणि मेल्याचे नाटक करतो.
अस्वल शामच्या जवळ येते. ते शमला हुंगते. त्यानंतर अस्वल शामच्या कानाजवळ जातो. जणू काही अस्वल काहीतरी गुपित त्याच्या कानात सांगत आहे. शाम भीतीने शांत पडून राहतो.
थोड्या वेळाने, अस्वलाला वाटते की शाम मेलेला आहे म्हणून ते तिथून निघून जातो. राम घाबरून खाली उतरतो आणि शामला विचारतो, 'अस्वलाने तुला काय सांगितले रे'..? त्यावर शाम उत्तर देतो कि, "त्याने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्रापासून दूर राहा. जे मित्र संकटकाळी साथ देत नाहीत ते खरे मित्र नसतात. त्या Marathi Story मित्राला आपली चूक समजली.
तात्पर्य :- संकटकाळी जो मदत करतो तो खरा मित्र.
.jpg)
Comments
Post a Comment