लाकूडतोड्या व देवदूत Marathi Story
![]() |
| Marathi Story |
नदीकाठी असलेल्या एका झाडावर चढून एक लाकुडतोड्या लाकडे तोडत असतो. लाकडे तोडत असताना अचानक त्याची कुऱ्हाड नदीत पडते. नदी खोल असल्यामुळे त्याला नदीत जाऊन ती कुऱ्हाड काढता येत नव्हती. तो दु:खी होऊन रडू लागतो.
हे पाहून नदीतून एक देवदूत येतो. तो Marathi Story त्याला म्हणतो की, काळजी करू नकोस. मी तुला तुझी कुऱ्हाड काढून देतो. तो देवदूत नदीत डुबकी मारतो व सोन्याची कुऱ्हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कुऱ्हाड ? लाकुडतोड्या म्हणतो, नाही ही माझी कुऱ्हाड नाही.
देवदूत पुन्हा नदीत डुबकी मारतो व चांदीची कुऱ्हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कुऱ्हाड ? लाकुडतोड्या म्हणतो नाही. मग तो देवदूत लोखंडाची कुऱ्हाड काढतो. लाकुडतोड्या आता मात्र हीच माझी कुऱ्हाड असल्याचे सांगतो. कुऱ्हाड परत मिळाल्याने आनंदी होतो. Marathi Story लाकुडतोड्याचा प्रामाणिकपणा पाहून देवदूत लाकुडतोड्यावर प्रसन्न होतो. त्याला सोन्याची व चांदीची अशा दोन्ही कुऱ्हाडी बक्षीस म्हणून देतो.
.jpg)
Comments
Post a Comment