हुशार मुलगा आणि चोर Marathi Story
![]() |
| Marathi Story |
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक चोर होता. त्याला आपण चोर असण्याचा गर्व होता. त्याला वाटायचे की, Marathi Story आपल्या इतके हुशार कोणीच नाही. येथे मला चोरी करण्यामध्ये कोणीच हरवू शकत नाही. तो सहज कोणालाही मूर्ख बनवत असे. तो कुठेतरी चोरी करायला गेला आणि चोरी न करता परत आला आहे अस कधीच झाल नाही.
एके दिवशी चोराने एका विहिरीजवळ एका मुलाला पाहिले. तो मुलगा रडत होता. चोराने त्याला विचारले. "तू का रडत आहेस?" मुलाने त्याला दोरीचा एक तुकडा दाखवून म्हटले कि. " या विहिरीत, माझी चांदीची बादली पडली आहे." चोराने विचार केला. " पहिली मी याची बादली काढून देतो.
मग याची बादली चोरुयात. "विचार करून चोर मुलाला म्हणाला. "तू रडणे थांबव" मी बादली शोधून काढतो. Marathi Story त्याने कपडे काढले आणि विहिरीत उडी मारली. त्याने बादली शोधली, पण त्याला तिथे काहीच मिळाले नाही. जेव्हा तो विहिरीतून बाहेर आला.
त्याने पाहिले की, मुलगा त्याचे सगळे कपडे घेऊन गायब झाला होता. त्याने चोराला मूर्ख बनवले होते. व चोर स्वताच फसला होता.
तात्पर्य :- गर्वाचे घर खाली.

Comments
Post a Comment