गर्विष्ठ गाढव आणि एक कुत्रा Marathi Story

Marathi Story
 

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका माणसाजवळ एक गाढव आणि एक कुत्रा होता. एक दिवस तो माणूस त्याच्या जनावरांबरोबर शहरातून परतत होता. गाढवाच्या पाठीवर Marathi Story पोती लादलेली होती. तिघेही भुकेलेले आणि थकलेले होते.

मालक नेहमी गाढवाची जादा काळजी घेत असे. त्यामुळे गाढवाला गर्व झाला होता. गाढवाला कुत्र्याशी दोस्ती करण्यात रस नव्हता. ते जंगलातून जात असताना तो माणूस थकलेला असल्यामुळे थोडा वेळ आराम करण्यासाठी जंगलात एका झाडाखाली बसला आणि त्याला झोप लागली. 

गाढव गवत खायला लागला. कुत्रा गाढवाला म्हटला. "कृपा करून थोडा खाली वाक" "मी तुझ्या पाठीवर असणाऱ्या पोत्या मधून थोडेसे खायला घेतो. मला खूप भूक लागली आहे. गाढव त्याला म्हटला, "आपल्या मालकाला उठू देत. ते Marathi Story तुला काहीतरी खायला देतील." कुत्रा गुपचूप झोपला. 

अचानक तेथे का लांडगा आला आणि तो गाढवावर तुटून पडला. गाढव कुत्र्याला म्हणाला." "मित्र कृपाकरून माझे प्राण वाचव." " कुत्र्याला बदला घेण्यासाठी आयती संधी मिळाली होती. कुत्रा त्याला म्हटला, "आपल्या मालकाला उठू देत तो तुला वाचवेल. "गाढव जसा वागला होता. तसेच कुत्र्याने पण उत्तर दिले. 

तात्पर्य :- करावे तसे भरावे याची प्रचीती त्याला आली. 







Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story