हरिण व कोल्हा Marathi Story

Marathi Story
 
एका कोल्ह्याला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही Marathi Story हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच आकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्ह्याने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेने हे पाणी प्यायला मिळत आहे.

' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्ह्याला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्ह्याला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रद्धा असते, Marathi Story अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टीकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.' 

तात्पर्य :- दुसऱ्याच्या श्रद्धेविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.  







Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story