दोघे मुलगे आणि दुकानदार Marathi Story

 

Marathi Story

दोन तरुण मुलगे एका Marathi Story फराळाच्या दुकानात गेले आणि दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहे असे पाहून, त्यापैकी एकाने एक लाडू चोरला आणि ती दुसर्याकडे दिला. त्याने तो आपल्या खिशात लपविला. लाडवांच्या ताटातला वरचा लाडू गेलेला पाहून, दुकानदारास या दोघांचा संशय येऊन तो म्हणाला, 'तुमच्याशिवाय माझा लाडू कोणी चोरला नाही'. हे ऐकताच, ज्याने लाडू चोरला होता, तो म्हणतो, 'देवाची शपथ घेऊन सांगतो कि, तुमचा लाडू मजपाशी नाही.'

ज्याच्या खिशात लाडू होता Marathi Story तो म्हणतो, 'मीही शपथ घेऊन सांगतो कि, मी काही तुमचा लाडू चोरला नाही.' दुकानदार म्हणाला, 'तुम्ही दोघापैकी कोणी लाडू चोरला, हे मला सांगता येत नाही, पण तुम्हांपैकी एक असामी चोर असून, तुम्ही दोघेही लबाड आहात, हे मी अगदी खात्रीने सांगतो.'

तात्पर्य - लबाडीने खरे भाषण करण्यात मोठेसे भूषण नाही, कृत्यातही खरेपणा पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story