वेळेचे महत्त्व Marathi Story

Marathi Story

 

एक घोड स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असताना घोड्याच्या एका पायाच्या नालेचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसून आले. पण तेथे Marathi Story दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळेने लढाईला जाण्याचा इशारा देणारे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. 

तिथे गेल्यावर त्या फौजेच्या सेनापतीने हुकुम सोडला की, 'सर्वांनी आपली घोडी भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे आणि त्यांचा पाठलाग करावा.' हुकुमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिला पडल्यामुळे सैल झालेला घोड्याची नाल पडली व त्यामुळे घोडा लंगडत-लंगडत पळू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्याने स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या Marathi Story हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले. 

तात्पर्य :- वेळच्या वेळी काम न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे. 











Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story