लौकिक राजा Marathi Story

Marathi Story
 

जनकराजाच्या ज्ञानी अलिप्तपणाची ही कथा. राजा जनक कीर्तन ऐकण्यात दंग होता. कीर्तन अगदी रंगत आले होते. इतक्यात एक रक्षक धावत आला आणि त्याने जनकाच्या कानात हळूच Marathi Story सांगितले, 'महाराज ! राजवाड्याला आग लागली आहे.' जनक म्हणाला, 'मी कीर्तन ऐकतो आहे. देवाची भक्ती करतो आहे. आता काही सांगू नको. नंतर ये.' थोडा वेळ गेला. 

रक्षक पुन्हा धावत आला. म्हणाला, 'महाराजा ! आग भडकली आहे. कोठीघरापर्यंत थोड्या वेळातच पसरेल.' तरीही जनक स्तब्धच होता. कीर्तन सुरूच होते. तेवढ्यात रक्षकाने तिसरी बातमी आणली. 'महाराजा ! आपला राजवाडा जवळजवळ जळून खाक झाला आहे आणि आता आग शहरात पसरण्याची शक्यता आहे. साऱ्या प्रजेची Marathi Story घरं जळून खाक होतील.' हे ऐकल्यावर मात्र जनक ताडकन उठला. 

म्हणाला, 'कीर्तन थांबवा. मी गावात जातो. सगळ्या प्रजेच्या रक्षणाची काळजी मला घ्यावी लागेल. ती माझी जबाबदारी आहे.' म्हणजे राजाला स्वत:चा राजवाड्याचे दू:ख नव्हते. प्रजेचा जीव, मालमत्ता त्याला वाचवायची होती. 

तात्पर्य :- कर्तव्याला लिप्त आणि स्वत:च्या सुखसोयीशी अलिप्त राहिले तरच व्यक्तीचा लौकिक शतकानुशतके राहतो.   












Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story