प्रेमळ बोल Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला. Marathi Story त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू असा पळून का जातोस ? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.; यावर तो कोंबडा म्हणाला. 'अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाईकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे.
त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. Marathi Story त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.'
तात्पर्य :- प्रेम बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही.
.jpg)
Comments
Post a Comment