लट्ठ कोंबडी बारीक कोंबडी Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एका मुसलमानाचा घरी एक हाऱ्यात काही कोंबडी ठेवली होती. त्यातली काही कोंबडी फार लट्ठ होती व काही अगदी Marathi Story बारीक होती. जी लट्ठ होती, ती त्या बारीक कोंबड्यांची, त्यांच्या अशक्ततेबद्द्ल वरचेवर थट्टा करून त्यास हिणवीत असत.
शेवटी, एके दिवशी त्या मुसलमानाच्या घरी मेजवानी होती, तेव्हा त्याने आपल्या नोकरास आज्ञा केली की, 'ह्या कोंबड्यात जी लट्ठ असतील त्यांस मरून त्यांची कढी करा.' त्याप्रमाणे, Marathi Story नोकर जेव्हा त्या लट्ठ कोंबड्यास ठार मारू लागले तेव्हा ती आपल्या मनात म्हणतात, 'आम्ही जर त्या दुसऱ्या कोंबड्यासारखी बारीक असतो,
तर ह प्रसंग आमच्यावर आज खचित आला नसता.'
तात्पर्य :- संपत्तीमुळे मनुष्यास गर्व येतो ; परंतु जेव्हा लुट होते आणि दरोडे पडतात तेव्हा तिच संपत्ती दू:खास कारण होते.

Comments
Post a Comment