कोल्हा आणि लांडगा Marathi Story

Marathi Story
 


एक कोल्हा एकदा एका लांडग्यात म्हणाला, 'मित्रा माझी स्थिती किती वाईट आहे याची तुला कल्पना नाही. एखाद्या म्हातारा कोंबडा किंवा मरायला टेकलेली अशक्त कोंबडी यांच्या मांसावर मला निर्वाह करावा लागतो. त्यामुळे मी अगदी Marathi Story कंटाळल्यासारखा झालो आहे. शिवाय भक्ष्य मिळवताना आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रसंग तुला क्वचित येत असेल. मला भक्ष्याच्या शोधासाठी गावठाणात लपतछपत फिरावं लागतं. तुझं तसं नाही. 
तू आपलं भक्ष्य रानात ; कुरणात मिळवू शकतोस ही तुझी विद्या मला शिकवशील तर बरं होईल. तुझ्या हाताखाली शिक्षणासाठी राहिल्याने कोल्ह्याच्या वंशात जन्म घेऊन पहिल्याने मेंढी मरून खाण्याचा मान मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे. तू मला शिकवलंस तर आपले श्रम फुकट गेले असं म्हणायची वेळ तुझ्यावर नक्कीच येणार नाही.' लांडगा म्हनला, 'ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहतो. 
प्रथम तू पलिकडच्या शेतात माझा भाऊ मरून पडला आहे त्याच कातडं पांघरून ये.' तसं करताच लांडग्याने त्याला निरनिराळे धडे शिकवले. गुरगुरणे, चावणे, लढाई करणे, मेंढ्याच्या कळपावर तुटून पडणे, एखादी मेंढी उचलून नेणे या गोष्टीचे शिक्षण कोल्ह्याला दिले. सुरुवातीला हे सगळे कोल्ह्याला लवकर जमेना. पण तो Marathi Story मुळातच हुशार असल्याने ते सगळे तो लवकरच व्यवस्थित करू लागला.
त्याची हुशारी पाहून लांडग्याला आश्चर्य वाटले, शेवटी एक मोठा मेंढ्यांचाकळप कोळ्याका दिसताच त्याच्यावर तुटून पडून एका क्षणात त्याने मेंढ्या, धनगर व त्याचे कुत्रे यांची अगदी दाणादाण उडवून दिली. त्याने एक मोठी मेंदी आपल्या तोंडात धरली व तिला मारणार तोच शेजारच्या शेतातून कोंबड्यांचा आवाज ऐकू आला.
तो ओळखीचा आवाज ऐकताच आपल्या नव्या वेषाचे त्याला भां राहिले नाही व त्याने ते लांडग्याचे कातडे फेकून दिले व गुरुचा निरोपही न घेता तो तडक कोंबड्याकडे धावला. 

तात्पर्य :- मुळचा स्वभाव कितीही शिक्षण झाले तरी जात नाही. 















Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story