गाढवाचा गैरसमज Marathi Story

Marathi Story
 

एकदा एका पाथरवटाने देवाच्या सुंदर मूर्ती बनवल्या. देवाच्या मूर्ती विकण्यासाठी बाजारात न्याव्यात म्हणून त्याने आपल्या गाढवावर त्या मूर्ती लादल्या व तो बाजाराच्या दिशेने निघाला. दगडात कोरलेल्या त्या देवांच्या मूर्ती पाहून येणारे सहजच Marathi Story हात जोडून मूर्तींना नमस्कार करीत. 

पण नमस्कार त्या देवाच्या मूर्तींना आहे हे त्या मूर्ख गाढवाला कळले नाही. त्याला वाटे जो तो आपल्यालाच नमस्कार करतोय. त्यामुळे स्वत:ला कोणी तरी मोठा समजून गाढव एक पाऊलही पुढे टाकीना. बराच वेळ पाथरवटाच्या लक्षात येईना. गाढव अडलंय का ? 

आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा Marathi Story हातातल्या काठीचा जोरदार फटका गाढवाला हाणत पाथरवटा म्हणाला, "प्रत्येक माणूस तुला नमस्कार करतोय आणि तू कोणी महान आहेस असं तुला वाटतंय. पण मुरका लोक नमस्कार त्या मूर्तींना करता आहेत. आता चल नाही तर आणखी मार खाशील." 

तात्पर्य :- खोट्या अहंकाराने फजितीची वेळ येते. 









Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story