बहिरी ससाणा, कासव आणि सिंह Marathi Story
![]() |
| Marathi Story |
खूप वर्षांपूर्वी, जंगलात एका झाडावर बहिरी ससाणा हा पक्षी आणि त्याचे कुटुंब राहत असते. त्यांची जंगलातल्या प्राण्यांशी विशेषत: कासव सिंह आणि पाणकावळा ह्या सर्वांशी Marathi Story त्याची छानच मैत्री होते.
एक दिवस एक शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी येतो. तो ससाण्याच्या पिल्लाला झाडावर पाहतो. ससाण्याचे मांस खाण्याची इच्छा शिकाऱ्याची होते. त्याची शिकार करण्याचे तो ठरवतो. त्यासाठी शिकारी आग पेटवितो. हे सगळे दृश्य त्या पिलाची आई पाहते असते. ती पतीला सांगते की, 'आपल्या मित्रांना मदतीसाठी बोलवा नाही तर शिकारी आपल्या पिल्लाला खाऊन टाकेल.
ससाणा लगेचच मित्रांना बोलवायला Marathi Story जातो. त्याचे मित्र कासव, सिंह, पाणकावळा लगेचच त्याच्या मदतीसाठी निघतात. पाणकावळा शिकाऱ्याने केलेला जाळ पाहतो आणि त्याच्यावर चोचीने पाणी शिंपडतो. कासव त्यावर वाळू टाकून आग विझवतो. सिंह मोठ्याने गर्जना करतो.
सिंहाची गर्जना ऐकून शिकारी घाबरून पळून जातो. ससाणा त्याच्या मित्राने वेळेवर मदत केल्याने त्यांचे आभार मानतो. पुढे ते सगळे आनंदाने राहू लागतात.
तात्पर्य :- संकट काळी जो मदत करेल तोच खरा मित्र.
.jpg)
Comments
Post a Comment