भला माणूस Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एका श्रीमंत व्यक्तीने एक मंदिर बांधले. मंदिरात ईश्वराची पूजा करण्यासाठी एक पुजारी नेमला. मंदिराचा खरच चालवा म्हणून खूप सारी जमीन, शेती आणि बाग मंदिराच्या नवे केली. मंदिरात जे भुकेले, दीन-दू:खी आणि साधुसंत येतील, Marathi Story ते तेथे दोन-चार दिवस राहू शकतील, त्यांच्या भोजनासाठी भगवंताचा प्रसाद मंदिरातून मिळेल ; अशी व्यवस्था त्यांनी केली होती. आता त्यांना एका अशा माणसाची आवश्यकता होती जो मंदिराच्या निधीची व्यवस्था करेल आणि मंदिराचे सर्व कामकाज व्यवस्थित चालवेल.
खूप इच्छुक लोक त्या श्रीमंत व्यक्तीकडे आले. ज्याला या मंदिराच्या व्यवस्थेचे काम मिळेल त्याला पगार चांगला मिळेल, हे ते जाणत होते. परंतु त्या श्रीमंत व्यक्तीने सर्वांना परत पाठवले. तो सर्वांना म्हणत असे - "मला एक भला माणूस पाहिजे, मी स्वत:च त्याची निवड करेन."
खूप लोकांनी मनातल्या मनात त्या श्रीमंत व्यक्तीला शिव्या दिल्या. खूप लोक त्याला मूर्ख किंवा वेडा म्हणत होते. परंतु त्या श्रीमंत व्यक्तीने कोणाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. Marathi Story जेव्हा मंदिराचे व्दार उघडत असे, लोक ईश्वराच्या दर्शनासाठी येऊ लागत तेव्हा ती श्रीमंत व्यक्ती आपल्या घराच्या छतावर बसून मंदिरात येणाऱ्या लोकांचे शांतपणे निरीक्षण करत होती.
.png)
Comments
Post a Comment