जीवनाचे रहस्य Marathi Story

Marathi Story

एक माणूस जीवनाला कंटाळला Marathi Story होता. त्याला असे वाटत होते कि, इतक्या मोठ्या जगात आपण एकाकी आहोत. त्याला कोणी जवळ करत नाही, तो कोणाच्या प्रेमास पात्र नाही, असा विचार करून दुःखी राहायचा. वसंत ऋतू आला आणि चहूकडे सुगंधी फुले उमलल्याने सुवासाचा दरवळ पसरला होता. सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना त्या व्यक्तीने स्वतःला घरात कोंडून घेतले होते.

अचानक एक छोटी मुलगी दरवाजा Marathi Story उघडून घरात आली व म्हणाली,"तुम्ही उदास आहात असे दिसते.याचे कारण काय?" तो म्हणाला, " माझ्यावर कोणी प्रेम करत नाही." ती मुलगी म्हणाली,"तुम्ही कोणावर प्रेम करता?" त्याच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा ती मुलगी त्याला म्हणाली," बाहेर येऊन पहा ! तुमच्या दारासमोर प्रेमाचा किती दरवळ आहे." तिने त्याचा हात धरून बाहेर पसरलेल्या फुलांच्या ताटव्यात उभे केले. तुम्ही ज्या फुलांवर जितके प्रेम कराल तितके करा ! ते तितकेच प्रेम तुम्हाला देतील."त्या मुलीच्या बोलण्याने त्याचा भ्रम दूर झाला आणि त्याचे जीवन आनंदी झाले.

तात्पर्य : जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला कि जीवन आनंदी होण्यास मदत होते. 

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story