सिंहाची गुणज्ञता Marathi Story

 Marathi Story

 एका सिंहाने एक हरिण Marathi Story मारले व त्यांस तो फाडून खाणार, इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता, तो त्यास म्हणतो, " अरे सिंहा" , "या हरिणाचे अर्धे मांस तुझे व अर्धे माझे' हे ऐकूण सिंह म्हणाला, " अरे निगरट्ट माणसा, " तुझा तेथे कोणत्याही प्रकारचा संबंध नसता, एकाकी पुढे होऊन, मी मारलेल्या सावजाचे अर्धे मांस तू मागतोस, या तुझ्या निर्लजपणाबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू येथून चालता हो, नाही तर फुकट मरशील मात्र.'  

हे ऐकताच चोर भयाने पळून गेला. इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने आला व सिंहास पाहून, त्यास टाळण्यासाठी दुसऱ्या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंह त्यास आदराने हाक मारून म्हणाला, " अरे भल्या माणसा, भिऊ नकोस, तुझ्या चांगुलपणामुळे, या सावजाच्या मासांचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य  Marathi Story आहेस, इकडे ये आणि आपला वाटा घेऊन जा.' इतके बोलून सिंहाने त्या सावजाचे दोन भाग करून एक भाग आपण खाल्ला व दुसरा त्या माणसाकरिता ठेवून तो अरण्यात गेला. 

तात्पर्य : लोचटपणा करून डोके उठविणाऱ्या माणसाचा लोकास कंटाळा येतो. पण जे सभ्य आणि भिडस्त आहेत, त्यांचा परामर्श लोक आपण होऊन घेतात. 

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story