हे अंड आपलं नाही Marathi Story
![]() |
| Marathi Story |
नदीकाठी एक मगर आई व मगरबाबा राहत होते. ते दिवसभर आपल्या घरट्याची राखण करीत बसत. मगरीन आईने सहा अंडी उगविण्यासाठी ठेवली होती. दोघेही त्या अंड्यातून केव्हा आपली पिल्लं बाहेर येतील याची आतुरतेने वाट पाहत होते. Marathi Story त्या अंड्याची मायेने कौजी घेत होते. आपला जीव कि प्राण असलेल्या पिल्ल्यांच्या भविष्याची स्वप्न रंगवत होते. मगरीन आई म्हणाली, आपल्या पिल्लांना छान झपझप पोहायचं कसं ते मी शिकवणार त्यांना छ्हान छान खाऊ घालून ताकदवान ककरेन.
मगरबाबा म्हणाले, मी त्यांना नदीकाठी थंडगार सुरक्षित जागा कुठे असते. विश्रांतीसाठी सावली कुठे मिळेल ते शिकवेल. दोघेजण आपल्या पिल्ल्यांच्या सुखाच्या हिताच्या गोष्टी करीत बसत. एकूण सहा अंडी उबविण्यासाठी ठेवली होती. अचानक मातीच्या उंच ओट्यावरून एक सातव अंड गरंगळत खाली आलं, कोण जाणे कुठून कसं ते पण ते सहा अंड्याजवळ येऊन थांबलं.
मगरीनबाईच्या उगवलेल्या सहा अंड्यातून एक एक करीत नाजूक पिलावळ बाहेर आली. पाच पोरं आणि एक पोरगी. मगर आई-बाबांना आपली नाजूक पोरं पाहून खूप आनंद झाला. ते दोघं दिवस-रात्र मायेने एक टक्क त्यांच्याकडे पाहत बसे. काळजी घेत बसे. मगरीन बाईचे लक्ष त्या सातव्या अंड्याकडे गेलं. मगर बाबा म्हणाले हे सातव अंड आलं कुठून काही कळेना पण हे जरा वेगळंच दिसते बरं दोघांनाही त्या Marathi Story अंड्याबद्दल कुठून आलं वाटत होतं.
एके दिवशी सातव अंड ही उगलं आणि अंड टिचल. ते पिल्लू टिचलेल्या अंड्यातून बाहेर कुतुहलाने चौफेर टुकूटुकू बघत होतं त्यातून नाजूक सोनेरी पिवळसर बदकाचं पिल्लू बाहेर आलं. मगरबाबांनी आपल्या सहा पिलांना नदीकाठी पोहायला शिकवायला नेलं. मगरबाबाच्या मागे मागे पिल तुरु तुरु एकमेकांच्या खोड्या काढीत निघाली होती. इकडे मगर आईने सातव्या नाजूक सोनेरी बदक पिलाला छोट्या टेकडी पलीकडे त्याच्या आईकडे नेऊन सोडलं. बदकआईने मगर आईचे खूप आभार मानले.
बदक आईला आपलं हरवलेलं पिल्लू मिळालं. तिनं आपल्या पिल्लाला प्रेमाने कुशीत घेतलं. बदक पिल्लूही आईच्या कुशीत धावून गेलं. बदक आई आणि पिलांची भेट घालून दिल्यामुळे मगरीन बाईंना खूप खूप आनंद झाला.
.jpg)
Comments
Post a Comment