विलक्षण कुत्रा Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एक शिकारी होता. त्याने Marathi Story एक शिकारी कुत्रा विकत घेतला. तो कुत्रा विलक्षण होता कारण त्याला पाण्यावर चालण्याची पळण्याची कला अवगत होती. आपल्या या कुत्र्याच्या विलक्षण गोष्टीमुळे आपल्या मित्रमंडळींना चकित करता येईल या कल्पनेने तो आनंदित झाला.
एकदा त्याने त्याच्या Marathi Story एका मित्राला शिकारीचे आमंत्रण दिले. कुत्र्यासोबत दोघे जंगलात शिकारीला गेले तेथे एका तळ्यात त्यांनी बदके मारली. शिकार्याने कुत्र्याला बदके आणण्यास सांगितले तसे तो कुत्रा पाण्यावर पळत जाऊन बदके आणू लागला. बराच वेळ हा प्रकार चालू राहिला पण शिकार्याचा मित्र कुत्र्याबद्दल काहीच बोलत नव्हता.
आपल्या कुत्र्या बद्दल मित्र आश्चर्य व्यक्त करेल असे त्याला वाटले होते पण त्याने काहीच प्रतिक्रिया नाही दिली. शेवटी घरी जाता जाता शिकार्यानेच विचारले "तुला माझ्या कुत्र्यामध्ये काही वेगळे नाही जाणवले का ?" तेव्हा त्याचा मित्र म्हणाला,"हो, तुझ्या कुत्र्याला पाण्यात पोहता येत नाही."
.jpg)
Comments
Post a Comment