आकाशात तारे किती Marathi Story
![]() |
| Marathi Story |
कधी कधी चांदण्या रात्री बिरबल आणि बादशहा गप्पा मारत बसायचे. असेच एकदा बादशहा आणि बिरबल चांदण्या रात्री गप्पा मारत असताना बादशहाचे आकाशाकडे लक्ष गेले. आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्याकडे पाहताना बादशाहाला आनंद वाटत होता. Marathi Story आकाशातील तारे पाहून बादशाहने बिरबलाकडे आकाशात किती तारे आहेत ते सांगू शकशील का?
'न सांगायला काय झाले? ' बादशहाला परत प्रश्न विचारीत बिरबल म्हणाला, ते समोरचे चिंचेचे झाड आहे ना त्याला जितकी पाने आहेत त्याच्याबरोबर दुप्पट आकाशात तारे आहेत. बिरबल तू गाढव आहेस बादशहा म्हणाला चिंचेच्या झाडाची पाने मोजणे शक्य आहे काय.
जवळच्या झाडाची पाने मोजता येत नसतील तर खूप दूर असलेल्या आकाशातील तारे कसे मोजता येतील. Marathi Story बिरबलाने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर देणे बादशहाला शक्य नव्हते.
तात्पर्य :- आकाशात तारे अगणित आहेत ही गोष्ट बादशहाच्या लक्षात आणून देण्यासाठी बिरबलाने इथे चिंचेच्या झाडाचा आधार घेतला आहे. चिंचेच्या झाडावरती अगणित पाने असतात.

Comments
Post a Comment