सिंह कोल्हा Marathi Story

Marathi Story
 

एकदा एक म्हातारा सिंह खूप आजारी पडला. जंगलातील सर्व प्राण्यांना त्याने भेटायची इच्छा व्यक्त केली. त्यानं सर्व प्राण्यांना आपल्या गुहेत भेटण्यासाठी बोलावलं. सिंह म्हणाला मित्रांनो Marathi Story मी खूप आजारी आहे. आता माझं केव्हा बरं वाईट होईल हे सांगता येत नाही. 

कृपया तुम्हाला मी तयार केलेलं माझं मृत्यूपत्र वाचून दाखवायचं म्हणतो. वनराजाच्या आदेशाने जंगलातले सर्व प्राणी एका नंतर एक येऊ लागले. देवरा आला कुत्रा आला माकडा आली घोडे अशाप्रकारे सर्वजण वनराजाच्या गुहेत शिरले. 

काही वेळानंतर प्राण्यांचे येणे थांबले. वनराज सिंह मात्र अजूनही अनेकांची वाट बघत होता. तो म्हणाला अजून बरेच जण यायचे बाकी आहेत ते का बर आले नाहीत. सिंहाला काळजी वाटू लागली. 

त्याला राहवलं नाही. त्यांना गुहेच्या बाहेर जाऊन Marathi Story पाहिलं तर बाहेर एक कोल्हा उभा होता. शहाणे त्याला विचारले अरे तुम्ही असं बाहेरच का थांबला आत या ना तुमचीच वाट बघत होतो मी. 

धूर्त कोल्हा म्हणाला महाराज गुहेत आत गेलेल्या सगळ्यांच्या पावलाचे ठसे पाहता मला असे लक्षात आले कि जसे गुहेत जाण्याचे पावलांचे ठसे दिसले तसे ते बाहेर जाण्याचे पावलाचे ठसे कुठेच दिसले नाही. म्हणजे आज गुहेत गेलेला कोणीही बाहेर परत आलं नाही. 

धूर्त कोल्ह्याचं म्हणणं ऐकून सिंहाला राग आला. त्याने रागात मोठी डरकाळी फोडली. डरकाळीच्या आवाजाने सर्व प्राणी घाबरले. जीव मुठीत घेऊन पळू लागले. 

हुशार कोल्हा, इतर प्राण्यांना म्हणाला कळलं तुम्हाला मी काय म्हणालो ते. शत्रूकडे जाणं सोपं असतं पण शत्रूच्या जाळ्यातून सुरक्षित परतन फार अवघड असतं. 

















Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story