फुगा Marathi Story
एक फुगेवाला होता. तो Marathi Story जत्रेत, शाळेच्या आणि मैदानाच्या आवारात फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्या कडे लाल, पिवळे, हिरवे, निळे अशे विविध प्रकारचे फुगे असायचे. विक्री कमी होते असे दिसले कि तो फुग्यात हेलियम वायू भरून हवेत सोडून देई. .jpg)
Marathi Story
उंच हवेत उडणारा फुगा पाहून मुले फुगे घायला त्याच्याकडे गर्दी करत आणि भरपूर फुग्यांचा खप होत असे. एकदा असेच फुगे विकत असताना एक छोटी मुलगी त्याच्या जवळ आली आणि तिने विचारले,"काका, हा गुलाबी रंगाचा फुगाही असाच आकाशात उडेल का ?"
तिच्या जिद्नासेच Marathi Story त्याला कौतुक वाटलं आणि प्रमाणे त्याने उत्तर दिले, "बेटा, फुगा त्याच्या रंगामुळे उंच आकाशात उडत नाही तर त्याच्या आत जे आहे त्यामुळे तो उडतो."
हीच गोष्ट आपल्या प्रत्यकाला लागू होते. आपल्या अंतरंगातील गुणधर्मामुळे माणूस यश समृद्धी प्राप्त करून इच्छित उंचीवर जाऊ शकतो. आपला दृष्टीकोन आणि मनोवृत्ती याला आपण आपले अंतरंग म्हणू शकतो.
Comments
Post a Comment