सिंहाचे कातडे पांघरलेले गाढव Marathi Story

Marathi Story
 

एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे Marathi Story पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे कि, त्याच्या जवळ सुध्दा ताकात, सौंदर्य किंवा गोड आवाज असता तर दुसऱ्या प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती. 

एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत त्याला सिंहाचे कातडे पडलेले दिसले. प्रथम गाढवाने त्याचाकडे दुर्लक्ष केले आणि पुढे तो चालू लागला. मग त्याला अचानक एक युक्ती सुचली. त्याने ते सिंहाचे कातडे घेतले आणि अंगावर टाकले. त्याला वाटले आता सगळ्या प्राण्यांना वाटेल कि, मी सिंह आहे आणि ते माझा आदर करतील. 

सिंहाचे कातडे अंगावर पांघरून गाढव पुढे निघाला. वाटेत तो एका गिधाडाजवळ पोहचला. गिधाडाने त्याला Marathi Story सिंहच समजले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. गाढवाला हे सर्व पाहून खूप मजा आली. आता त्याला वाटले कि, तो आता सहज जंगलात राजा बनेल. त्यानंतर तर जो किणी कातडे पांघरलेल्या गाढवाला पाहत असे ते घाबरून पळून जायचे. गाढवाला या खेळामध्ये खूप मजा वाटायला लागली. 

थोड्याच वेळात गाढव एका कोल्हीनी शेजारी येऊन थांबला. गाढव तिला घाबरवायला जातो. कोल्हीन त्याचा आवाज ऐकते. कोल्हीन त्याला म्हणाली, "जर मी तुझा रेकण्याचा आवाज ऐकला नसता तर मी पण तुला घाबरले असते." गाढव बिचारा एवढंस तोंड करून निघून गेला. सिंहाचे कातडे पण त्याचा बावळटपणा लपू शकला नाही. 

तात्पर्य :- अति शहाणा त्याचा बैल रिकामा. 

























Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story