चिंच Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एके दिवशी एक कावळा चिंचेच्या झाडाच्या फांदीवर बसला. त्याने टाकलेल्या विष्टेतून Marathi Story बाभळीच्या बिया चिंचेच्या झाडाखाली पडल्या. त्यातील एक बी उगवून बाभळीचे एक झाड हळूहळू वाढू लागले. त्याने त्या चिंचेच्या झाडाशी दोस्ती केली. त्या दोस्तीचा गैरफायदा घेवून ते चिंचेच्या झाडाचे मन इतरांच्या विषयी कलुषित करू लागले. ते म्हणायचे, 'अरे काय तू, कोणीही येते आणि तुझ्या सावलीत विसावा घेते. तुझ्या चीनचा तुला न विचारता घेवून जाते. त्या माणसांची पोरे तर तुला दगडे मारतात.'
'मग काय बिघडले ?' चिंचेचे झाड म्हणाले,'माझ्या सावलीत जे विसावा घेतात, बसतात, त्यामुळे Marathi Story त्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद होतो. माझ्या चिंचा लोकांसाठीच असतात. त्यातील चिंचोके कुठे तरी उगवतात आणि माझा वंश वाढतो. आता माणसांची पोरे मला दगडे मारतात, पण त्यांचा हेतू मला दगडे मारणे हा नसून चिंचा पाडणे हा असतो. त्यांनी चिंचा नेल्या तर पुढे माझाच वंश वाढणार असतो. शिवाय त्यांनी मारलेली दगडे मला फुलासारखी वाटतात.'

Comments
Post a Comment