ब्राम्हणाची ब्रम्हहत्येतून सुटका Marathi Story
![]() |
| Marathi Story |
"तुलसीदासाच्या आश्रमात Marathi Story अनेक अध्यात्मिक कार्यक्रम होत असत. त्यात एक कार्यक्रम ब्राम्हण-भोजनाचा देखील होता. नेहमीप्रमाणे एकदा आश्रमामध्ये ब्राम्हण-भोजनाची तयारी चालू होती. त्यावेळेस तेथे एक गरीब व दरिद्री ब्राम्हण आला. त्या भोजनाची तयारी सुरु आहे, त्यावेळेस तेथे एक गरीब व दरिद्री ब्राम्हण आला. त्या ब्राम्हणाला खूप भूक लागलेली होती. भोजनाची तयारी सुरु आहे, हे त्याला दिसत होते, तरीदेखील तो भुकेला ब्राम्हण 'जय सीताराम' असे म्हणत भिक्षा मागू लागला.
तुलसीदासने त्याच्याकडे Marathi Story पाहिले. त्याला एवढाही धीर नाही. भोजनासाठी तो इतका व्याकूळ झालेला बघून तुलसीदासांनी त्याचे पूर्वसंचित ओळखले.
त्या ब्राम्हणाने पूर्वी एक दुष्कर्म केले होते व त्याचाच परिणाम म्हणून तो दरिद्री झाला होता. त्याचे दुष्कर्म कोणते होते ? तुलसीदासांना लगेच समजले की, त्या ब्राम्हणाने पूर्वी ब्राम्हहत्या केली होती. ते समजल्यावर त्यांनी त्या ब्राम्हणाला बाजूला न करता उलट प्रेमाने त्याला अलिंगन दिले. स्वतःजातीने त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला भोजनाला नेऊन बसविले. परंतु त्या एवढ्या मोठ्या साग्रसंगती पंगतीमध्ये तो ब्राम्हण भोजनास बसायला तयार नव्हता, कारण तेथे अनेक बुद्धिमान , महाज्ञानी ब्राम्हण भोजनास आले होते.
तेथे जमलेल्या सर्व ज्ञानी ब्राम्हणांना त्याचे पूर्वसंचित कळले. त्यांना वाटले की, जर हा ब्राम्हहत्या करणारा महापापी, भिकारी, दरिद्री ब्राम्हण, आमच्याबरोबर जेवायला बसला तर आपली मान खाली जाईल. आपला धर्म भ्रष्ट होईल, विटाळ होईल. अशी जाणीव होताच वाराणसीचा कर्मठ ब्राम्हवृंद तुलसीदासाला म्हणाला, "या ब्राम्हहत्यारी माणसाला जर आमच्या पंगतीला बसवले तर आम्ही भोजन करणार नाही. त्याची पात्रता तरी आहे का ? आमच्या समवेत भोजन करण्याची !
ब्राम्हवृंदाचे हे बोलणे ऐकून तुलसीदास अतिशय शांत होते. ते सर्वांकडे हसून बघत म्हणाले, "लोकहो, याने देखील रामनामाचा उच्चार केला आहे. या कलियुगामध्ये नामस्मरण हाच एक परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आहे.
परंतु त्या कर्मठ ब्राम्हवृंदाला त्यांचे म्हणणे काही पटले नाही. ते तुलसीदासांना म्हणाले, "समोर शंकराचे एक मंदिर आहे. जर या ब्राम्हणाने मंदिरातील नंदीला नेवैद्य दाखविला आणि नंदीने तो भक्षण केला तर त्याचे ब्राम्हतेज परत आले आहे असे आम्ही समजू, आणि त्याची ब्राम्हाहत्येच्या पापातून मुक्तता झाली आहे असे आम्ही मानू. तेव्हा आम्ही त्याला आमच्या पंगतीमध्ये बसण्याची अनुमती देऊ."
ते ऐकून तुलसीदास लगेचच त्या ब्राम्हणासमवेत नेवैद्य घेऊन शिवमंदिरात गेले. त्यांनी हात जोडून महादेवाला प्रार्थना केली व म्हणाले, "हे शंकरा, तू महाविष प्राशन केले होते तेव्हा तुझ्या अंगाची लाही लाही झाली होती पण रामनाम उच्चारताच त्या विषाचा दाह शांत झाला, हे जर सत्य असेल तर तुझे वाहन नंदी हा या ब्राम्हणाने दाखविलेला नेवैद्य खाईल."
खरोखरच तेथे चमत्कार झाला. तुलसीदासांनी प्रार्थना केली तोच तेथे नंदी जिवंत झाला व त्याने ताटातील नेवैद्य खाल्ला. ते बघून सर्व ब्राम्हण थक्क झाले. तुलसीदासाचे म्हणणे ऐकूनच महादेवांनी त्या ब्राम्हहत्या करणाऱ्या ब्राम्हणाची पापातून सुटका केली होती. त्यानंतर सर्व ब्राम्हणांनी तुलसीदासाला वंदन केले व सर्वजण मठात परत आले आणि त्यांनी सर्वांनी त्या गरीब ब्राम्हणाबरोबर आनंदाने भोजन केले.
.jpg)
Comments
Post a Comment