सर्पाची दोरी Marathi Story
"तुलसीदासने बघितले Marathi Story की, सर्वजण गाढ झोपले आहेत. घरात कसे जाणार. हा विचार करत असतानाच त्यांना घराची एक खिडकी फक्त उघडी दिसली. त्यांना जरा बरे वाटले. त्यांनी बघितले की, खिडकीबाहेर काहीतरी लांबलचक लोंबकळत आहे. तो त्यांना अंधारात दोरखंडच वाटला म्हणून ते दोरी समजून त्यावरून भराभर चढून खिडकीतून आत गेले. 
Marathi Story
ते ज्या खोलीत शिरले, ती बरोबर त्यांच्या पत्नीची ममतादेवींचीच खोली होती. त्यांना एवढ्या पावसात आलेले पाहून ती थक्क झाली व त्यांना म्हणाली,"नाथ, बाहेर एवढा पाऊस पडत आहे व त्यामुळे यमुनेला महापूर आलाय. आमच्या घराचे सर्व दरवाजे देखील बंद आहेत. मग तुम्ही आत कसे काय आलात ?"
ते ऐकून तुलसीदास तिला Marathi Story म्हणाले, "प्रिये मला वर येता यावे म्हणून तूच तर खिडकीला दोरखंड ठेवला होतास ना ? त्याला धरूनच मी वर आलो आहे." पतीच्या या बोलण्याचे ममतादेवींना खूप आश्चर्य वाटले. कारण तिने तर कुठलाच दोरखंड ठेवला नव्हता.
मग त्या पतीला म्हणाल्या , "स्वामी मला तो दोरखंड दाखवा बार."
तुलसीदास लगेच आपल्या पत्नीला खिडकीपाशी घेऊन गेला. तिने खिडकीबाहेर डोकावून पहिले तर काय, खूप मोठा साप खिडकीबाहेर लोंबकळत होता. त्या सापाला बघून ती खूपच घाबरली. परंतु त्यांना पतीच्या पत्नीप्रेमाचे असे अचाट धाडस बघून खूप कौतुक वाटले.
ममतादेवी आपल्या पतीला घेऊन शयनमंदिरात गेल्या व त्यांना मंचकी बसवत म्हणाल्या,"स्वामी माझ्यावर जे तुमचे निस्सीम प्रेम आहे, तेच तुम्हाला येथे घेऊन आले आहे. तुम्ही माझ्यावर हे पराकोटीचे प्रेम करता म्हणून प्रत्यक्ष परमेश्वर तुम्हाला मदत करण्यासाठी सर्परूपाने धावून आले. तुम्ही अशी पत्नी भक्ती करण्यापेक्षा देवभक्ती करा. तुमचे जीवन त्यामुळे सफल होईल व जीवनाचा उध्दार होईल.
तुलसीदास हा पत्नीने केलेला उपदेश ऐकून खूपच भावूक झाला. त्याला अचानकपणे विरक्ती आली व पत्नीचे म्हणणे पटले. त्याबरोबर त्याने आपल्या पत्नीला "माता" म्हणत तिचे चरण पकडले व तो लगेच तपाला आनंदवनी निघून गेला.
Comments
Post a Comment