चोर तुलसीदासाचे भक्त Marathi Story
![]() |
| Marathi Story |
"तुलसीदासाच्या भक्तीचे Marathi Story महत्त्व आता वाराणसीच्या लोकांनाही कळाले व ते देखील भक्तीमार्गाला लागले. तुलसीदासाला भजन-कीर्तन, प्रवचन करता यावे म्हणून वाराणसीकरांनी तेथेच एक मोठा मठ बांधून दिला. तेथील सर्व लोक तेथे येऊ लागले आणि परमेश्वराच्या भक्तीत रमू लागले. तुलसीदासाची मधुर वाणी सर्व लोकांना मंत्रमुग्ध करत असे, तुलसीदास जे भजन गात असे, ते भजन आता लोक इतर वेळेस कम करताना देखील म्हणू लागले. वाराणसीचे सारे वातावरण बदलून अगदी भक्तिमय होऊन गेले.
एके दिवशी रात्रीच्या वेळी Marathi Story कीर्तन चालू होते. त्यात सर्व भक्तजन रंगून गेले होते. कीर्तन संपल्यावर तुलसीडासांच्या मठात दोन चोर शिरले. त्या चोरांनी मठातील संपत्तीचे गाठोडे घेतले व ते आश्रमातून पळाले. परंतु ते पळत असताना त्यांना दरवाजाजवळ असलेल्या सेवक रक्षकांनी अडविले. अचानक त्यांना समोर बघून चोर खूपच घाबरले. येथे नेहमी पहारेकरी नसतात हे बलदंड पहारेकरी कुठून आले ? असा प्रश्न चोरांच्या मनात आला. त्यांनी ते चोरलेले गाठोडे तेथेच टाकले व ते तेथून पळू लागले. पण पहारेऱ्यांंनी त्यांना पकडूनच ठेवले. त्यांनी चोरांना पहाटेपर्यंत धरून ठेवले.
पहाट झाली तेव्हा भक्तजन काकड आरतीला जमा झाले. तुलसीदासही आरतीला आले. तोपर्यंत पहारेकरी मात्र निघून गेले होते. तुलसीदास येताच चोरांनी त्यांचे पाय धरले आणि आपला गुन्हा कबूल केला.
तुलसीदासांना अंर्तज्ञानाने समजले की, मठाचे व्दारपाल पहारेकरी म्हणून काल रात्री प्रत्यक्ष राम-लक्ष्मण आले होते म्हणूनच ते चोरांना पकडू शकले.
तेव्हा तुलसीदास त्या चोरांना म्हणाले, "या गाठोड्यातून तुम्हाला हवे तेवढे धन घ्या. तुम्हाला आज अगदी सहजरित्या रामदर्शन झाले आहे. कारण तुम्हाला पकडणारे पहारेकरी हे प्रत्यक्ष राम-लक्ष्मण होते."
चोरांना वाटले की, स्वतः परमेश्वराने आपल्याला पहारेकऱ्यांंच्या रुपात अडविले आणि आपण मात्र किती नीच कृत्य करीत होतो, या गोष्टीची जाणीव होताच चोरांची मती पालटली त्यानंतर ते चोर तुलसीदासाचे अतिशय कट्टर भक्त बनले आणि वाराणसीच्या मठात राहूनच सेवा करू लागले.

Comments
Post a Comment