तुलसीदासांचा दैवी चमत्कार Marathi Story

 Marathi Story
"वाराणसीमध्ये एक जैतपाळ नावाचा सावकार रहात होता. त्याचा एके दिवशी अचानक मृत्यू Marathi Story झाला. त्याचा मृत्यू झालेला पहाताच त्याची पत्नी अतिशय दुःखी होऊन सती जण्यास निघाली. वाटेत तुलसीदासांचा आश्रम होता. जाण्यापूर्वी महान संत तुलसीदासांचे दर्शन घ्यावे म्हणून ती त्यांच्या दर्शनाला गेली. 

ती मठात गेली तेव्हा तुलसीदास नामस्मरणात दंग होते. तिने त्यांना नमस्कार  केला. त्या सतीने नमस्कार करताच तुलसीदासांनी तिला 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव ' असा शुभ आशीर्वाद दिला. तेव्हा ती त्यांना म्हणाली, "महाराज, माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे आणि म्हणून मी सती चालले आहे तेव्हा आता आपला हा आशीर्वाद कोणत्या जन्मात खरा होणार ?" 

ते ऐकून तुलसीदास तिला Marathi Story शांतपणे म्हणाले,"मी तुला हा नकळत दिलेला आशीर्वाद आता रामरायाच सत्य करतील." असे म्हणून ते परत रामनामजप करू लागले.

खरोखरीच चमत्कार झाला. ती स्त्री जेव्हा आपल्या पतीच्या प्रेतापाशी गेली तेव्हा तिचा पती जैतपाळ सावकार हा एकदम जसे काही झालेच नाही अशा थाटात उठून बसला. तो उठल्यावर पत्नीने त्याला सर्व झालेला प्रकार सांगितला. तुलसीदास महाराजांच्या कृपेने आपण वाचलो आणि आपल्या पत्नीला पुत्र होण्याचा आशिर्वाद देखील दिला. ते दोघे खरोखरीच फार आनंदित झाले. दोघांनीही तुलसीदासांला वंदन केले. 

हो गोष्ट घडल्यानंतर सर्वच लोक तुलसीदासांना ईश्वरी अवतार आणो थोर संत असे मानू लागले. 

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story