तुलसीदासांची विरक्ती Marathi Story

Marathi Story

तुलसीदासने खरोखरच Marathi Story पत्नीची आज्ञा मानून संसाराकडे पाठ फिरवली. आणि तो तप करू लागला. तप करता करता अशी बारा वर्षे गेली. या बारा वर्षात तुलसीदासाने अतिशय खडतर तपश्चर्या केली. 

बारा वर्ष तो रोज नित्यनेमाने एका झाडाला पाणी घालत असे. एके दिवशी ते त्या झाडाला पाणी घालून निघाले, तेवढ्यात त्यांना त्या झाडावर एक पिशाच्च भेटले. 

ते पिशाच्च त्यांना म्हणाले,"मी तुझ्या सेवेमुळे प्रसन्न झालो आहे. तुला काय हवं ते वरदान मागून घे." 

ते ऐकून तुलसीदास त्याला म्हणाले, "मला आता दुसरे काही नको . मला फक्त प्रभू रामचंद्राची भेट घडवून आण." 

रामाचे नाव ऐकून पिशाच्च मागे सरकले आणि म्हणाले,"मारुती हा रामसेवक आहे. त्याचे दर्शन मी तुला घडवतो. तू ज्या ठिकाणी रोज नित्य पुराण श्रवणाला जातोस, तेथे एक वृद्ध ब्राम्हण हा मारुती आहे." 

त्यावर तुलसीदास त्याला Marathi Story म्हणाले, परंतु मी त्यांना कसे ओळखणार ?" 

पिशाच्च त्यांना म्हणाले, "तेथे जो सर्वात आधी येऊन सर्वात शेवटी जातो व तो डोक्यात टोपी घालतो, आणि त्याचा हातात काठी असते. त्याने अंगावर रामनामाचे वस्त्र परिधान केलेली असते." 

पिशाच्चाने हे सांगताच तुलसीदास आश्रमी परत आले. दुसऱ्या दिवशी ते नेमाने पुराणाला गेले. त्यांनी बघितले की, खरोखरच तो वृद्ध ब्राम्हण तेथे येत होता. पुराण संपताच तो सर्वात शेवटी निघत असे. त्याने आजही तसेच केले. तो निघाल्याबरोबर तुलसीदास त्याच्या मागोमाग निघाले व वाटेत त्यांनी त्याला नमस्कार केला. त्याला आशीर्वाद देताना तो ब्राम्हण त्यांना म्हणाला,"माझ्या जवळ तुला देता येण्यासारखे काहीच नाही. कारण मी एक गरीब ब्राम्हण आहे." 

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story