काशीरामची भक्ती Marathi Story

 Marathi Story
 गावात एक Marathi Story काशीराम नावाचे साईबाबांचे भक्त होते. ते बाबांचे नित्य नियमाने दर्शन घेत असे. 

काशीरामला कधी व्यवसायात यश द्या असे म्हणावे लागले नाही. बाबांच्या वरील निस्सीम भक्तीमुळे काशीरामला यश मिळत होते. पंचक्रोशीत काशीराम हा एक चांगला व्यापारी म्हणून ओळखले जात असे. काशीरामजवळ नेहमी पैसे असायचे. त्याकाळात आजसारखी वाहने नव्हती, त्यामुळे कित्येक वेळा बाजार उरकून पायी यावे लागत असे. तेव्हा रस्त्यात चोरी करून Marathi Story चोर कित्येक माणसांना आडरानात भेटला की मारून बळजबरीने त्याच्याकडील सर्व ऐवज घेत असत. काशीरामच्या ख्यातीवरून चोरांना माहित झाले होते की, काशीरामजवळ बरेच पैसे असतात. एकदा काशीराम बाजार उरकून पायी जात होता. त्याला वाटेत चोरांनी अडविले. चोरांनी काशीरामला काठ्यांनी खूप मारायला सुरुवात केली. त्या चार चोरांपुढे त्या एकट्याचे काय चालणार होते. तरीदेखील काशीरामने साईबाबांचा धावा केला. 

शिर्डीत बाबा धुनीजवळ बसले होते. हा प्रकार बाबांना तेथे समजला. बसल्या बसल्या बाबांनी काशीरामला बळ दिले. त्या बळामुळे काशीरामने त्या चार चोरांना मारून मारून पळवून लावले. त्याला रात्री उशीर झाला होता, तरीदेखील तो प्रथम बाबांचे दर्शन घ्यायला गेला. 

त्याला पहाताच बाबांनी विचारले, "काशीराम खूप लागले का ? त्यांनी तुझे काही चोरले तर नाही ना " ते ऐकल्यावर काशीरामच्या लक्षात आले की, 'आपल्या अंगात जे बळ आले ते सर्व बाबांच्या कृपेमुळे आहे.' त्याने लगेच बाबांचे पाय धरले. बाबांनी लगेच त्याला उदी लावली व आशिर्वाद दिला. 

म्हणून, प्रत्येकाच्या संकटकाळी बाबा मदत करतात. जे साईभक्त असतात, त्यांच्यावर त्यांचे विशेष लक्ष असते. 

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story