परमेश्वराचा चमत्कार Marathi Story

 Marathi Story

 
समुद्र किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या लोकांचे एक गाव होते. एका संध्याकाळी सगळे Marathi Story मासेमारी करणारे लोक आपली-आपली नाव घेऊन मासे पकडायला समुद्रावर निघून गेले. जेव्हा ते परत यायला निघाले, त्याचवेळेस तुफान आले. ते मच्छीमार रस्ता चुकले. तिकडे गावामध्ये त्यांचे कुटुंब त्यांच्या काळजीत परमेश्वराची प्रार्थना करत होते. तेव्हा अचानक एक वीज पडली आणि एका मासे पकडणाऱ्याच्या घराला आग लागली. सगळे मासेमारी करणारे लोक गावाच्या बाहेर होते, म्हणून कोणीही आग विझवू शकले नाही. 

सकाळी सगळ्यांना इतका आनंद झाला की ते सांगूच शकत नव्हते, कारण सर्व मासेमाऱ्यानी आपल्या नावा किनाऱ्यावर सुरक्षित लावल्या होत्या. ज्या मासेमाऱ्यांच्या Marathi Story घरात आग लागली होती, त्याची पत्नी रडत-रडत सारा घडलेला प्रकार सांगत होती. तेव्हा पती तिला म्हणाला,"घर जळाल्याचे दुःख मला देखील आहे. परंतु त्याच जळत असलेल्या घराला बघून आम्हाला समजले की, आमची वस्ती कुठे आहे ते !" 

ते ऐकून त्याच्या पत्नीचे रडणे बंद झाले आणि ती परमेश्वराचे आभार मानू लागली. दुसऱ्याच दिवशी सगळ्या लोकांनी मिळून त्यांच्यासाठी एक नवीन घर तयार केले. 

बोध 

यावरून आपणास समजते की, परमेश्वर जर कोणाचे घर जाळतो, तेव्हा त्यापाठीमागे त्याचा नक्कीच काहीतरी हेतू असतो. 

Comments

Popular posts from this blog

Haunted House English Story

वाईट संगतीचे परिणाम Marathi Story

बहरे चूज़े और मुर्गे Hindi Story