गुरुदक्षिणा Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एक दिवस गुरु Marathi Story ज्ञानदेव हे नदीच्या काठावर साधना करण्यात गुंग होते. तेव्हा त्यांचा एक शिष्य त्यांच्याजवळ आला. त्याने गुरूंच्या प्रति भक्ती आणि समर्पणाची भावना म्हणून त्यांच्या पायाजवळ दोन अमूल्य असे मोती ठेवले. ते मोती म्हणजे त्याच्याकडून गुरूंना दक्षिणा होती.मोतींच्या स्पर्शाने गुरूंनी आपले डोळे उघडले आणि शिष्याला विचारले,"हे सगळे काय आहे?"
शिष्य म्हणाला,"गुरुजी हे मोती माझ्याकडून तुम्हाला गुरुदक्षिणा आहे. कृपया तुम्ही याचा स्वीकार करा."
गुरूंनी दोन्ही मोती Marathi Story हातात घेतले, त्यातील एक मोती हातातून निसटून नदीत जाऊन पडला. शिष्याने पाण्यात उडी मारली. तो खूप वेळ मोती शोधत होता. शेवटी निराश होऊन त्याने गुरूंना विचारले,"तुम्ही बघितले का, मोती कुठे पडला ते ! तुम्ही मला टी जागा सांगितली तर तो शोधून मी तुम्हाला परत आणून देईन."
गुरूंनी दुसरा मोती उचलला आणि तोही नदीत टाकत ते म्हणाले,"तेथे पडला होता."
त्यांचे तसे वागणे पाहून शिष्याला समजले की, हा अनमोल मोती त्याच्यासाठी किंमत असू शकेल परंतु गुरूंना त्याची काहीही गरज नाही. त्याने दक्षिणा देण्याच्या स्वरुपात चुकीच्या वस्तूचा अवलंब केला होता.
बोध
यावरून आपणास समजते की, गुरूंच्यामुळे मिळालेले ज्ञान हे अतिशय अनमोल असते, त्याची आपण काहीही किंमत लावू शकत नाही.

Comments
Post a Comment