कावळा आणि कालव Marathi Story
एक कावळा Marathi Story समुद्राकाठी फिरत असताना त्याला एक कालव सापडले. त्यातील मांस काढून खावे म्हणून तो ते दगडावर आपटू लागला. जवळच एक लबाड डोमकावळा बसला होता. तो त्याला म्हणाला,'मित्रा, दगडावर आपटून हे कालव काही फुटणार नाही, तेव्हा तू हे तोंडात धरून उंच उंच जा आणि तिथून ते खाली टाकून दे. म्हणजे ते फुटेल.'
Marathi Story
कावळा बिचारा भोळा Marathi Story होता. त्याने कालव तोंडात धरून एक उंच भरारी मारली आणि तिथून ते खाली टाकून दिले. जमिनीवर पडताच लबाड डोमकावळ्याने ते पळवले आणि तो उडून गेला.
तात्पर्य :- लबाड मनुष्याच्या सांगण्यावर कधीही विश्वास ठेवू नये.
Comments
Post a Comment