समर्थ रामदासस्वामी आणि शिष्य कल्याण Marathi Story
"गुरूंचे आज्ञापालन Marathi Story केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली, त्यांतीलच एक होते कल्याण स्वामी. त्यांचे मुळचे नाव अंबाजी. एकदा समर्थ रामदास स्वामींनी अंबाजीला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितले. ही फांदी तोडतांना विहिरीत पडण्याचा धोका होता ; तरीही अंबाजीने गुरु आज्ञा प्रमाण मानून कुऱ्हाडीने फांदी तोडण्यास आरंभ केला. फांदी तोडण्यात मग्न झालेला अंबाजी काही वेळाने त्या फांदीसहित विहिरीत Marathi Story पडला. सर्व जण घाबरले. समर्थांना हे कळताच ते तेथे आले. त्यांनी विहिरीत डोकावून विचारले, "अंबाजी, कल्याण आहे ना ?" 
Marathi Story
"हो , कल्याण आहे स्वामी !" विहिरीतून उत्तर आले.
"चल ये तर मग वरती." समर्थांचे वाक्य ऐकताच अंबाजी वर आला आणि समर्थांच्या कृपेने सुखरूप असल्याचे त्याने सांगितले. त्या दिवसापासून समर्थांसहित सर्व जण त्याला "कल्याण" या नावाने हाक मारू लागले.
Comments
Post a Comment