बाळाची वाटणी Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एकदा एका मूल होत नसलेल्या एका बाईने दुसऱ्या एका बाईचे दोन महिन्यांचे मूल पळविले. खऱ्या Marathi Story आईला त्या चोरट्या बाईचा पत्ता लागताच, ती तिच्याकडे गेली व आपले मूल परत मागू लागली ; पण ती चोरटी बाई ते मूल आपलेच असल्याचा दावा करू लागली. अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले. न्यायमूर्ती अत्यंत चतुर होते. त्यांनी
दोघींनीही अशी चपलख उत्तरे दिली, की न्यायमूर्तीही या दोघींतली खरी आई कोण ? ह्या संभ्रमात पडले.
अखेर न्यायमूर्ती त्या दोन बायांना खरे वाटेल अशा तऱ्हेने मुद्दाम म्हणाले, ज्या अर्थी तुम्ही दोघीही हे मुल आपलेच असल्याचा दावा करता, व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे त्यामुळे मी या मुलाला कापून त्याचा अर्धा अर्धा भाग तुम्ही दोघींपैकी प्रत्येकीला देण्याचा निर्णय देत आहे.'
न्यायमूर्तींचा हा कठोर निर्णय Marathi Story ऐकून चोरटी बई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी आई रडू लागली. कळवळून व हात जोडून न्यायमूर्तींना म्हणाली, 'न्यायाधीश साहेब, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका. वाटल्यास माझं बाळ या बाईला द्या, पण असं काही करू नका. कुणाकडे का असेना, माझं बाळ सुखरूप असलं की झालं ! त्या बाईच ते अपत्यप्रेम पाहून न्यायमूर्ती त्या लबाड बाईला म्हणाले, हे बालक या बाईचंंच आहे. त्याला कापण्यात यावं, असं मी खोत बोललो. पण त्यामुळे तुझा फसवा डाव उघड झाला. तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर , अशी निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत.'
अशा रितीन त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेलं मुल त्याच्या खऱ्या आईला देण्यात येऊन, न्यायमूर्तींनी त्या चोरट्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

Comments
Post a Comment