चांगला व्यवहार Marathi Story
![]() |
| Marathi Story |
एके दिवशी भोलाणे एक लाकडी पेटी बनविली. त्याने रामसुखला त्या पेटीत बसावयास सांगितले, रामसुख गपचूप आत बसला. भोलाने खूप प्रयत्न करून ती पेटी कशी-बशी पहाडीच्या कडेवर ओढत नेली. तो आता पेटीला धक्का मारणार, रामसुखने पेटीचा दरवाजा वाजवला. भोलाने पेटी उघडली.
रामसुख म्हणाला, " मला Marathi Story माहित आहे की तू मला येथून ढकलणार आहे. हे तू करण्याच्या आधी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. या पेटीला तू जपून ठेव. जेव्हा तू म्हातारा होशील, तेव्हा तुझ्या मुलांना त्याचा उपयोग होईल."
वडिलांचे बोलणे ऐकून भोलाचे डोळे उघडले. तो समजला की, कदाचित त्याचे मुल देखील त्याच्याबरोबर असाच व्यवहार करतील जसे तो आज त्याच्या वडिलांबरोबर करत आहे. त्याने लगेच पेटी उघडून वडिलांना बाहेर काढले आणि आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. रामसुखने भोलाला माफ केले आणि प्रेमाने जवळ घेतले.
बोध
यावरून आपणास समजते की, तुम्ही जसा व्यवहार आपल्या मोठ्या माणसांबरोबर कराल, तसाच व्यवहार तुमचे छोटे देखील तुमच्याबरोबर करतील. हे नेहमी लक्षात ठेवा.

Comments
Post a Comment