राजा जनक आणि ऋषी अष्टावक्र Marathi Story

Marathi Story
राजा जनक राजा असूनही Marathi Story त्यांना राज वैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहत. विनम्रता त्यांच्या स्वभावात होती. त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरूच असे. 

एकदा ते नदीकाठावर एकांतात बसून 'सोsहम' चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्टावक्र ऋषी चालले होते. ते परमज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले," माझ्या हातात कमंंडलू आहे आणि माझ्या हातात  छडी आहे." राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला पण त्याने आपला जप सुरूच ठेवला. अष्टावक्रही ही गोष्ट जोरजोरात बोलत राहिले.शेवटी जनकाने जप थांबवून विचारले," मुनिवार , हे तुम्ही मोठमोठ्याने काय सांगत आहात" अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले," माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे " राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला," महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्याजवळ छडी आणि कमंंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात." तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजांना Marathi Story समजाविले," राजन, माझ्याजवळ असणारा कमंंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोsहम उंच आवाजात म्हणणे आहे. मंत्राला घोकण्याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्मसात करणे किंवा त्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते." 

तात्पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते. 


Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story