सोन्याची पिसे Marathi Story

 Marathi Story td>
एका गावाच्या जवळ एक तळे होते. त्या तळयामध्ये एक हंसीण रहात होती. त्या तळ्याजवळच एक Marathi Story गरीब बाई आपल्या दोन मुलीं सोबत राहत होती. एके दिवशी हंसीणला वाटते कि, आपण या गरीब बाईला सोन्याची पिसे देऊन मदत करूयात. आपण जसे या बाईला मदत केली टर ती आणि तिच्या मुली आनंदाने राहतील. 

दुसऱ्या दिवशी हंसीण त्या गरीब English Story बाईला भेटायला गेली आणि म्हणाली, माझे एक सोन्याचे पीस मी तुम्हाला रोज देत जाईन. त्यानंतर हंसीण रोज त्यांना एक सोन्याचे पीस देऊ लागली. त्यामुळे ते कुटुंब सुखी झाले. कुटुंबाची परिस्थिती बदलली. आता ते आनंदाने राहू लागतात. 

पुढे ती बाई लोभी बनली. ती Hindi Story ठरवते कि एकदाची हंसीणची सर्व पिसे काढून घेऊयात. दुसऱ्या दिवशी ती बाई हंसीणला पकडते आणि पिसे ओढू लागते. पण अचानक त्या हंसीणच्या पिसांचे रंगरूप पालटते. पिसे सामान्य होऊन जातात. ते पाहून बाईला आश्चर्य वाटते. 

हंसीण तिला म्हणते' मी तुला मदत करण्याचे ठरवले होते पण तू हावरट झालीस. आता मी कधीही पुन्हा परत येणार नाही.' या बाईला आपली चूक उमगते आणि ती त्या हंसीणची माफी मागते. हंसीण तिला म्हणते 'पुन्हा कधी असा हावरटपणा करू नकोस' असे म्हणून ती उडून जाते. 

तात्पर्य :- माणसाने जास्त लोभी नसावे जे मिळते ते ही गमवून बसतो. 

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story