साधू आणि यक्ष Marathi Story

Marathi Story
एक साधू तपश्चर्येस एका Marathi Story निर्जन स्थळी बसले होते. त्या ठिकाणी एका यक्षाचे वास्तव्य होते. या गोष्टीची साधूला कल्पना नव्हती. ते जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा निर्जन स्थान पाहून त्यांनी तेथेच ध्यानधारणा सुरु केली. त्या वेळी यक्ष तेथे नव्हता. रात्री जेव्हा यक्ष तेथे आला तेव्हा आपल्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीला English Story पाहून त्याला राग आला. त्याने मोठ्याने आरडाओरडा सुरु केला, पण समाधी अवस्थेत असलेल्या साधूवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्यांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ध्यानस्थ असलेल्या त्यांच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्याचा प्रयत्न केला. 

कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्हा Hindi Story अशा जंगली प्राण्यांची रूपे घेतली तरी साधूच्या ध्यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्याने विषारी सापाचे रूप धारण करून त्यांना दंश केला तरीही त्यांच्यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्या प्रयत्नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्याने यक्ष झालेल्या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्था पूर्ण झाली व ते जागे व त्यांची नजर सर्परुपी यक्षावर पडली. त्या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते कि त्या कृपादृष्टीने सापाच्या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्याने त्यांना आदरपूर्वक वंदन केले. 

तात्पर्य : एकाग्रता, स्नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो. 

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story