खरे प्रेम Marathi Story

Marathi Story

 एका गावात दोन भाऊ Marathi Story रहात होते. ते दोघेही खूप गरीब होते. मोठ्या भावाची परिस्थिती छोट्या भावापेक्षा थोडी चांगली होती, परंतु त्याचे कुटुंब खूप मोठे होते. दोघेही भाऊ शेती करून आपला उदर - निर्वाह करत असे. 

एकदा नांगरणी करण्याची वेळ आली. तेव्हा मोठा भाऊ मनात हाच विचार करत होता कि आपल्या छोट्या Hindi Story भावाला कशी मदत करावी ? एका रात्रीच्या वेळी मोठ्या भावाने आपले थोडेसे धान्य घेऊन छोट्या भावाच्या धान्याच्या कोठीत टाकले म्हणजे त्यामुळे छोट्या भावाला आपली थोडी तरी मदत होईल. 

परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे केल्यावर देखील त्याच्याकडचे धान्य थोडे सुद्धा कमी झाले नाही. त्यानंतर पुढच्या दोनही रात्री तो छोट्या भावाच्या कोठीमध्ये धान्य टाकत होता पण तरी देखील त्याचे धान्य थोडे देखील कमी झाले नाही. त्याला या सर्व प्रकाराचे खूप नवल वाटत होते. या गोष्टीचा शोध घेण्यासाठी मोठा भाऊ आपल्या शेतात लपून बसला. काही वेळाने त्याला एक व्यक्ती कोठीघरात जाताना दिसली. ती व्यक्ती कोण आहे हे बघण्यासाठी मोठा भाऊ बाहेर निघाला. त्याने पाहिले कि, ती अनोळखी व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याचा English Story छोटा भाऊच होता. प्रत्येक रात्री छोटा भाऊ सुद्धा आपल्या भावाला मदत करण्यासाठी आपल्या धान्याचा काही हिस्सा मोठ्या भावाकडे ठेऊन येत होता म्हणजे त्याला आपण थोडीशी मदत करू शकू. 

या घटनेनंतर दोनही भावांना एकमेकांचे प्रेम कळून आले आणि ते एकत्र येऊन सुखाने राहू लागले. 

बोध : 

यावरून आपणास समजते कि, बंधू प्रेम हीच खरी संपत्ती आहे. 

Comments

Popular posts from this blog

Haunted House English Story

वाईट संगतीचे परिणाम Marathi Story

बहरे चूज़े और मुर्गे Hindi Story