धाडसी शुभम Marathi Story

Marathi Story

 
एक मुलगा होता.त्याचे Marathi Story नाव शुभम होते.शुभम हा खूप धाडसी व चतुर मनाचा मुलगा होता.शुभम मध्ये एवढी हिंमत होती की तो कोठेही एकटा जाऊ किंवा एकटा राहू शकत होता.शुभम फक्त तेरा वर्षाचा मुलगा होता.शुभम हा खूप धाडसी असल्यामुळे त्याच्या आई-वडिलांना ही काही काळजी नव्हती.पण शुभम ला एक वेडा नाद होता.तो म्हणजे ज्या जागेमध्ये ज्या घरांमध्ये कोणीही जात नसेल किंवा कोणीही राहत नसेल त्या घरात English Story घुसायचा.शुभम खूप धाडसी मनाचा असल्यामुळे त्याला काहीही वाटत नव्हते.

असेच एके दिवशी त्याच्या आई-वडिलांना ऑफिसच्या कामानिमित्ताने बाहेरगावी जायचे असल्यामुळे त्याला एकट्याला घरात ठेवले गेले.व शुभम चे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले.

जेव्हा शुभम घरी एकटा होता.त्याच रात्री काही चोरांनी शुभमच्या घरी चोरी करायची ठरवले.चोरांनी पूर्ण तयारी केली.व शुभमच्या घरी चोरी करायला गेले.शुभम झोपलेला होता.एकूण दोन चोर होते.त्यामधील एका चोराच्या धक्क्याने एक टेबलवरचा ग्लास पडला.व शुभम ला जाग आली. शुभम ने चोरांना चोरी करताना पाहिले.चोर तिजोरीतले पैसे चोरत होते.हे शुभम ने पाहताच ओरडायला चालू केल.चोर! चोर!!चोर!!!

चोरांनी सगळे पैसे तिथेच ठेवून धाव घेतली.चोर पळून जाताना पाहून शुभम ने लगेच पोलिसांना फोन Hindi Story लावला.व चोर कुठे जातात म्हणून शुभमने त्याचा पाठलाग केला.आणि चोरांना पकडून दिले.

या कारणामुळे सरकारकडून आणि पोलीस कडून एक धाडसीपणाचा पुरस्कारही शुभमला दिला गेला. शुभम चे पोलीस दलाकडून स्वागत झाले. नंतर पोलिसांनी सर्व झालेला किस्सा सांगितला. व शुभम ला दोन शब्द बोलायला सांगितले. शुभमने बोलायला चालू केल्यावर त्याच्या आई-वडिलांची प्रशंसा केली.

तो म्हणाला की सर्व हे धाडस माझ्या आई-वडिलांकडून मला मिळाले आहे. व शुभमचे बोलणे संपल्यावर शुभमला तो धाडसाचा पुरस्कार दिला जातो.

हे सर्व त्याच्या आई-वडिलांना कळताच ते घरी परत आले, व शुभमला गर्वाने गळ्याला लावून घेतल.

शिकवण-:

  1. धाडस हे आयुष्यात कुठेही कामाला येऊ शकते.
  2. धाडस असल्यावर आपण चुकीचे काम सुद्धा बरोबर साध्य करू शकतो.
  3. धाडसा एक प्रकारे आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे.
  4. धाडसाने आपण कोणतेही काम साध्य करू शकतो.

Comments

Popular posts from this blog

मांजर आणि उंदीर Marathi Story

उंदराची टोपी Marathi Story

My beautiful home English Story