कर्तव्यनिष्ठा Marathi Story
लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते तेव्हाची गोष्ट. एके दिवशी त्यांचा एक मित्र त्यांना भेटायला Marathi Story आला. चहापानानंतर शिळोप्याच्या गप्पा चालल्या असताना तो मित्र शास्त्रीजीना म्हणाला, ‘मला तुम्हांला एक प्रश्न आहे. विचारू का?” त्यावर शास्त्रीजी म्हणाले, “खुशाल विचार.” मित्र म्हणाला, “तुम्ही पंतप्रधान, आहात. अहोरात्री देशाची सेवा करता. अशा वेळी कोणी तुमचा सत्कार करून कार्याचा गौरव करायचा असे ठरवले तर तुम्ही ते टाळता असे का? आपल्या कार्याबद्दल लोकांनी प्रशंसा केली तर त्यात काय वावगे आहे? उलट तो तुमचा अधिकारच आहे. तरी प्रसिद्धिपराङमुख राहू नका.”.jpg)
Marathi Story
ते ऐकून शास्त्रीजी म्हणाले, “मित्रा, मी आजपर्यंत कर्तव्यच श्रेष्ठ मानले आहे. आहे. अधिकार अधिकार English Story नाही. सत्कारसमारंभात वेळ घालविण्यापेक्षा तोच वेळ लोककल्याणासाठी घालविण्यास मला केव्हाही आवडेल.. मी अलिप्त राहिलो तरच खऱ्या अर्थाने माझे कार्य कर्तव्य पार पाडू शकेन. प्रसिद्धिीची लालसा कर्तव्यात बाधा आणते असे माझे स्पष्ट मत आहे. आपल्या मातृभूमीची सेवा करायला मिळणे यासारखी भाग्याची गोष्ट नाही. म्हणूनच ती मुकाट्याने करावी. तिचा गाजावाजा नको. ताजमहालसारखी वास्तू कितीही सुंदर असली तरी ती कशावर उभी आहे याचा विचार करावा आणि आपण पायाचे दगड व्हावे.
त्यावरच देशाचा ताजमहाल Hindi Story टिकून राहतो.” ते ऐकून त्या मित्राचे हृदय भरून आले. देशाचे एक उच्च पद भूषविणारे शास्त्रीजी आचार-विचारांनी किती श्रेष्ठ आहेत हे जाणून त्याच्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढला, मित्र हो! शास्त्रीजींसारखी असंख्य गुणवान माणसे आपल्या देशाला लाभली म्हणूनच आज आपली एवढी प्रगती झाली आहे.
Comments
Post a Comment