द्राक्षे आणि कोल्हा Marathi Story
एका जंगलात एक कोल्हा Marathi Story राहत होता. एके दिवशी, सकाळी त्या कोल्हाला भूक लागते. तो काहीतरी खाण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला. पण त्याला खायला काहीच मिळत नव्हते. शेवटी त्याला एक द्राक्षांचा मळा दिसला आणि तो द्राक्षांच्या मळ्यात गेला. तिथे सगळीकडे द्राक्षेच द्राक्षे असतात. सगळीकडे द्राक्षांचे घडच घड लटकलेले दिसतात. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते. तो विचार करतो, ही फळे चवदार दिसत आहेत. मला ती पाहिजेत. कोल्हा तिथे .jpg)
Marathi Story
थोडा वेळ बसतो आणि द्राक्षांचे वेल English Story आणि द्राक्षे नीट पाहत असतो. द्राक्षे खूप उंचावर असतात. त्याच्या पोहंचण्यापलीकडे उंच लटकत होती. त्यामुळे तो उडी मारून पिकलेले द्राक्षे पकडण्याचा प्रयत्न करू लागतो. परंतु तो द्राक्षापर्यंत पोहचू शकत नाही. तो पुन्हा पुन्हा उंचच उंच उड्या
मारतो पण द्राक्षे नेहमी त्याच्या Hindi Story उंचीपासून लांबच लांब असतात. काही वेळाने तो उड्या मारून मारून दमून गेला. त्यानंतर तो स्वतःशीच पुटपुटला, कोणाला खायला हवी ही आंबट द्राक्षे? मला तर नकोतच..! असे म्हणून तो तेथून निघून जातो. आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींचातिरस्कार कारण खूप सोप्पं असतं.
तात्पर्य - अंथरून पाहून पाय पसरावे.
Comments
Post a Comment